Saved in:
| Hovedforfatter: | |
|---|---|
| Format: | Recurso digital |
| Sprog: | |
| Udgivet: |
Zenodo
2026
|
| Fag: | |
| Online adgang: | https://doi.org/10.5281/zenodo.18479727 |
| Tags: |
Tilføj Tag
Ingen Tags, Vær først til at tagge denne postø!
|
Indholdsfortegnelse:
- <p><em><span>भारतीय पर्यटन हा देशाच्या आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक विकासाचा एक महत्त्वाचा घटक आहे. भारतातील वैविध्यपूर्ण भौगोलिक रचना, समृद्ध इतिहास, सांस्कृतिक परंपरा, धार्मिक स्थळे आणि नैसर्गिक सौंदर्य यांमुळे पर्यटन क्षेत्राला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. पर्यटनाचा सर्वांगीण व शाश्वत विकास साधण्यासाठी लोकप्रशासनाची भूमिका अत्यंत निर्णायक ठरते. लोकप्रशासन हे पर्यटनविषयक धोरणांची निर्मिती, अंमलबजावणी, नियंत्रण व मूल्यमापन करते. केंद्र, राज्य व स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या समन्वयातून पर्यटन विकासासाठी विविध योजना, धोरणे व प्रशासकीय यंत्रणा कार्यरत असतात. या संशोधन लेखामध्ये भारतीय पर्यटनाच्या विकासामध्ये लोकप्रशासनाची भूमिका, पर्यटन व सामाजिक विकास यांतील परस्परसंबंध, पर्यटनाचे आर्थिक व सांस्कृतिक महत्त्व तसेच पर्यटन विकासासमोरील प्रशासकीय अडचणी यांचा अभ्यास करण्यात आला आहे. पायाभूत सुविधांचा विकास, पर्यटन स्थळांचे संरक्षण, पर्यावरण संवर्धन, रोजगारनिर्मिती, ग्रामीण व वैद्यकीय पर्यटनाचा विकास, महिला सक्षमीकरण आणि स्थानिक लोकांचा सहभाग या माध्यमातून लोकप्रशासन पर्यटनाला चालना देते. तथापि, अपुरी पायाभूत सुविधा, प्रशासकीय समन्वयाचा अभाव व पर्यावरणीय ऱ्हास या अडचणी पर्यटन विकासात अडथळा ठरतात. त्यामुळे शाश्वत पर्यटन धोरण, विकेंद्रीकरण आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आवश्यक आहे. प्रभावी लोकप्रशासनामुळे भारतीय पर्यटनाचा शाश्वत व सर्वसमावेशक विकास साध्य होऊन भारताची जागतिक पर्यटन नकाशावर सशक्त ओळख निर्माण होऊ शकते.</span></em></p>